Posts

बाळंतपणात तूप,नको ग बाई !

Image
  बाळंतपणात तूप,नको ग बाई ! बाळंतपणात तूप नको ग बाई ! हे वाक्य आजकाल घराघरात ऐकू येत आहे . सध्याच्या काळात  सर्वसाधारणपणे  अगदी बारीक सडपातळ अंगकाठी म्हणजे 'फिट ' ही  संकल्पना जनमानसात रूढ झाली आहे. त्याच बरोबर जीन्स , टॉप हा पेहराव केला म्हणजे मॉडर्न ही  दुसरी एक संकल्पना समाजामध्ये प्रचलित झाली आहे त्यामुळे  सर्वसाधारणपणे  मुली,महिला स्लिम राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसून येतात. ही गोष्ट जरी चांगली असली तरी सर्वच स्लिम लोक फिट असतातच असे नाही. त्याच बरोबर आपल्याला असेही दिसून येते की बऱ्याचदा स्लिम राहण्याच्या नादात काही आवश्यक घटकांची कमतरता निर्माण झालेली दिसून येते  तर मुख्य मुद्दा असा आहे की  बाळंतपणात तूप नको हे म्हणणे कितपत योग्य आहे. त्याची दुसरी बाजू अशी की बाळंतपणात तूप खाल्ले तर वजन वाढते असा एक समज प्रचलित झाला आहे. या दोनही  मुद्यांचा विचार केला तर आपण आधी पहिला मुद्दा विचारात घेऊ  बाळंतपणात तूप खावे कि खाऊ नये  या प्रश्नाचे उत्तर असे आहे की  बाळंतपणात स्तनदा मातेने तूप खाणे अतिशय आवश्यक आहे. गरोदरपणात  बाळ हे आईच्या शरीरातील पोषण मूल्ये घेऊन वाढत असते त्या

कामधेनू

Image
  कामधेनू  आपल्या भारतीय संस्कृती मध्ये गायीला अनन्य साधारण महत्व आहे. आपल्या जन्मापासून ते अगदी शेवटा पर्यंत गाय आपली साथ देते. मूल जन्माला आले कि ते आईचे दूध तर पितेच पण गायीचे दूध पण पिते आणि अगदी शेवटच्या समयी अंत्यसंस्कारासाठी  गायीच्या शेणाच्या गोवऱ्याच वापरल्या जातात . अगदी लहानपणी आपल्याला सांगितले जाते की गायीच्या ठायी तेहतीस कोटी देवांचा वास आहे. आपल्या देव देवतांचे फोटो पहिले तरी आपल्याला त्यामध्ये गाय दिसते त्यामुळे हिंदू संस्कृती मध्ये गाय ही नेहमीच पूजनीय मानली गेली आहे.  मित्रांनो  मला आपल्या पूर्वजांचे नेहमीच फार कौतुक वाटते, तुम्ही जर बारकाईने या गोष्टीचा अभ्यास केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे, आपल्या पूर्वजांना ज्या ज्या गोष्टी मनुष्य जाती साठी खूप हिताच्या आहेत आणि त्या नष्ट होऊ नये असे वाटत होते त्याला त्यांनी देवत्व बहाल केले.  मित्रांनो देव म्हणजे तरी काय? देवाकडे आपण नेहमी जातो तेव्हा काय म्हणतो ते आपण पाहूया - देवा सर्वाना सुखी ठेव, सर्वांचे आरोग्य चांगले राहूदे , मला धन ,धान्य , आरोग्य संपन्न कर. आता मला सांगा तुम्ही हे जे सगळे मागत आहात ते आपल्य